गेट सेट ‘रिओ…’

August 5, 2016 7:30 AM0 commentsViews:

rio05 ऑगस्ट : ब्राझीलमध्ये रिओ ऑलिम्पिकचा थरार सुरू व्हायला आता काही तासच उरलेत उद्या पहाटे 4.30वाजता खेळाचा महाकुंभ सुरू होणार आहे. ऑलिंपिकची मशाल आता रिओ डी जानेरोमध्ये आली आहे आणि माराकान्या स्टेडियमच्या दिशेने मशालीचा प्रवास सुरू झाला आहे.

रिओ डी जानेरोमधून प्रवास करताना ब्राझीलच्या पारंपारिक सांबा डान्सची ऑलिम्पिक मशालीला साथ मिळत आहे. यावेळच्या
ऑलिंपिकमध्ये 28 खेळांच्या 306 स्पर्धा होणार असून जगभरातले 11 हजारापेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत.

नीता अंबानी ऑलिम्पिक कमिटीमध्ये

दरम्यान, रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी ऑलिम्पिक कमिटीमध्ये सहभागी होणार्‍या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. आयओसी च्या 129व्या सत्राला त्यांनी हजेरी लावली. नीता अंबानींचं ऑलिम्पिक कमिटीवर यावर्षी जूनमध्ये नॉमिनेशन झालं होतं. आपल्या नेमणुकीबद्दल नीता अंबानी यांनी आनंद व्यक्त केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close