मंत्री-आमदारांचे अच्छे दिन, एक ते दीड लाख वेतन भत्ता !

August 5, 2016 10:30 PM0 commentsViews:

vidhan bhavan305 ऑगस्ट : मंत्री आणि आमदारांचे पगार अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बरोबरीने करण्याचं विधेयक विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आलं. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचा पगार राज्याच्या मुख्य सचिवा एवढा असणार आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांचं वेतन हे जवळपास दीड लाख रुपये होणार आहे. तर कॅबिनेट मंत्र्यांचा पगार अतिरिक्त सचिवा एवढा, तर आमदारांचा पगार उपसचिव दर्जाच्या अधिकार्‍यांचा समकक्ष होणार आहे.

प्रत्येक छोट्या – छोट्या मुद्द्यावर राजकरण करणार्‍या आणि विधानसभेत गोंधळ घालणार्‍या सर्वपक्षीय आमदारांनी आपल्या स्वत:च्या पगारवाढीच विधेयक मात्र एकमताने मंजूर केलं. या विधेयकानुसार मंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत एक ते दीड लाख रुपये वेतन वाढ होणार आहे. तर माजी आमदारांना किमान 50 हजार वेतन मिळणार आहे. त्याचप्रमाणे सातवे वेतन आयोगही लागू होणार आहे.

विशेष म्हणजे दिव्यांगाच्या प्रश्नासाठी लढणारे आमदार बच्चु कडू या एकमेव आमदाराने या पगारवाढीला विरोध केला. आमदारांचे पगार वाढवायला हरकत नाही, पण अपंगाचे पगार 600 रुपयांवरून किमान 1000 रुपये करा अशी मागणी कडू यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close