पुण्यात ‘लेडी डॉन’ गजाआड, आतापर्यंत 23 गुन्हे दाखल

August 5, 2016 9:07 PM0 commentsViews:

पुणे, 05 ऑगस्ट : पुणे पोलिसांनी एका लेडी डॉनला अटक केलीये. कल्याणी उर्फ जयश्री देशपांडे हिला बाणेरजवळच्या सूस गावातून अटक करण्यात आलीय. ही कल्याणी पुण्यात उच्चभ्रू वर्तुळामध्ये वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवायची. ही कल्याणी मूळची गुजरातची आहे. तिच्यावर तब्बल 23 गुन्हे दाखल आहे.kalyani_deshpande

कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे. मूळची गुजरातची ही मुलगी नाना पेठेत राहणार्‍या उमेश देशपांडेंशी लग्न करून देशपांडे बनली. पुण्यामध्ये तिने गेली 20 वर्षं तळ ठोकला होता. तिने एका एका आंतरराज्यीय टोळीशी संधान बांधलं होतं. उच्चभ्रू वर्तुळातल्या वेश्या व्यवसायात ती मुली पुरवायची. कल्याणी देशपांडेवरच्या कोणत्याही खटल्यांचा अजून निकाल लागलेला नाही.

तिला अटक झाली तरी काही दिवसांत ती जामिनावर सुटायची आणि पुन्हा वेशाव्यवसाय सुरू करायची. कल्याणी देशपांडेचं गुन्हेगारी नेटवर्क परराज्यांत आणि परदेशातही आहे, असं बोललं जातं. कोथरूडच्या भुसारी कॉलनीत कल्याणी देशपांडेने नक्की कुठे वेश्याव्यवसाय चालवला होता याबद्दल पोलीस माहिती द्यायला तयार नाहीत.

आजवर तिच्यावर दाखल करण्यात आलेल्या इतक्या गुन्ह्यांनंतरही ती राजरोस पुन्हा वेश्याव्यवसाय कसा सुरू करते याचंचं सगळ्यांना आश्चर्य वाटतंय. कल्याणी देशपांडेवर ठोस कारवाई का होत नाही, तिच्याविरुद्धचे सगळे खटले प्रलंबित कसे ?असा प्रश्नही विचारला जातोय. या सगळ्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

पुण्याची लेडी डॉन

वेश्याव्यवसायासाठी पुरवायची मुली
– 2 खून केल्याचे गुन्हे दाखल
– 1998 मध्ये पिटाअंतर्गत गुन्हा
– आतापर्यंत 23 गुन्हे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close