जे डे हत्येप्रकरणी छोटा राजन विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल

August 5, 2016 9:27 PM0 commentsViews:

j_D_murder_caseमुंबई,05 ऑगस्ट : पत्रकार जे डे हत्येप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. कुख्यात गुंड छोटा राजनच्या विरोधात हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. राजनवर मोक्का, हत्येचा कट रचणे, आर्म्स ऍक्ट अंतर्गत आरोप करण्यात आले आहे.

2011 मध्ये मिड डेचे ज्येष्ठ पत्रकार ज्योतीद्रकुमार डे यांची पवईमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तब्बल 5 वर्षांनंतर या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. या आरोपपत्रामध्ये 41 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. तसंच आरोपीला 20 ग्लोबल सीम कार्ड पुरवण्याचा आरोपही करण्यात आला आहे. आज कोर्टात छोटा राजनला व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगनच्या द्वारे कोर्टात हजर करण्यात आलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close