म्हशीच्या दूध दरात वाढ

April 10, 2010 12:40 PM0 commentsViews: 7

10 एप्रिल महाराष्ट्र सरकारने दूध खरेदी दरात वाढ केल्यानने 11 एप्रिलपासून म्हशीच्या दूध दरात प्रती लीटर 2 रुपये वाढ होणार आहे. दूध उत्पादक संघांनी हा निर्णय घेतला आहे. गोकुळ, वारणा सहकारी दूध, हुतात्मा सहकारी दूध संघ, राजाराम बापू दूध संघ, महालक्ष्मी दूध संघ, चितळे डेअरी आणि धोटे दूध संघानी हा भाववाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे म्हैस दूधदरासाठी कोल्हापूरकरांना 28 ऐवजी 30 रुपये मोजावे लागणार आहेत. पुणेकरांना 31 ऐवजी 33 रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईकरांना 32 ऐवजी 34 रुपये मोजावे लागतील. मुंबईच्या आरे दूध संघाला फायद्यात आणण्यासाठी सरकारने म्हशीच्या दूध खरेदी दरात 4 रुपयांनी वाढ केली होती. तसेच गायीच्या दूध दरात 2 रुपये वाढ केली होती. त्यामुळे उत्पादकांना द्यावा लागणारा 2 रुपयांचा फरक वसूल करण्यासाठी विक्री दरातही वाढ करावी लागणार असल्याचे दूधसंघांनी जाहीर केले आहे.

close