गोव्याचे शिक्षणमंत्री बाबुश मॉन्सेरात यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

October 15, 2008 6:34 AM0 commentsViews: 11

15 ऑक्टोबर, गोवा – जर्मन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्याआरोपावरून गोव्याचे शिक्षणमंत्री बाबुश मॉन्सेरात यांच्या मुलावर रोहितवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहेकलंगुट पोलीस ठाण्यात हा एफआयर नोंदवण्यात आला आहे. अश्लिल मेसेजेस पाठवणं, कटकारस्थान रचणं या आरोपांसह, त्याच्यावर गोवा बालहक्क कलमही लावण्यात आलं आहे.'ऊठ गोयंकारा' या संस्थेचे निमंत्रक आणि गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते आयरीस रॉड्रीग्ज यांनीच हे प्रकरण उजेडात आणलं होतं. त्यांच्यावर काल रात्री 6-7 जणांनी जीवघेणा हल्ला केला होता.

close