घराला लागलेल्या आगीत सिलेंडरचे स्फोट

April 10, 2010 12:49 PM0 commentsViews: 1

10 एप्रिल रत्नागिरी जिल्ह्यातील साखरोळी गावात एका घराला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. ही आग एवढी भीषण होती की घरातील चार गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने घरातील माणसांना आपला जीव वाचवण्यात यश आले. परिसरात अग्निशमन दल नसल्याने चिपळूणमधून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. पण ते येईपर्यंत घर पूर्णपणे भस्मसात झाले होते. या आगीत घरातील 200 तोळे सोने वितळले. तर आगीमुळे 80 लाखांचे नुकसान झाले आहे.

close