लोणावळ्यातील पर्यटन स्थळं दोन दिवस बंद

August 6, 2016 4:05 PM0 commentsViews:

 

bhushi-dam

06 ऑगस्ट :  लोणावळ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. भुशी धरण, लायन्स पॉईन्ट, टायगर पॉईन्ट, लोहगड किल्ला आणि भाजे लेणी इथं पर्यटकांना शनिवार, रविवार जाता येणार नाही.

मुसळधार पावसामुळे भुशी धरण 100 टक्के भरलं आहे. मोठ्या प्रमाणात धरणातून पाणी सोडलं जात आहे. तसंच धुकं आणि वाढत्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनानं पर्यटन स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तसंच हवामान खात्यानेही पुढील 48 तासात अतीवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव भुशी धरणासह परिसरातील पर्यटन स्थळं शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बंद राहणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close