देशातील 80 टक्के गो-रक्षक ढोंगी आणि बनावट – पंतप्रधान मोदी

August 6, 2016 8:30 PM0 commentsViews:

pm_modi_in_us

06 ऑगस्ट :  गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची दुकानदारी सुरू असून 80 टक्के गोरक्षक ढोंगी आणि बनावट असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वयंमगोरक्षकांवर केली आहे. तसंच गोसेवा करायची असेल तर गाईला प्लास्टिक खाण्यापासून थांबवा कारण कत्तलीपेक्षा जास्त गायी प्लास्टिक खाऊन मरतात असं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMO मोबाईल ऍप लाँच करण्यात आलं, यावेळी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्प्लेक्समधून त्यांनी संवाद साधला.

रात्री गोरखधंदे करणारे दिवसा गोरक्षकाचा मुखवटा ओढून घेतात असा थेट आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरक्षकांना थेट लक्ष्य केले आहे. गोरक्षकांनी गेल्या काही महिन्यांत केलेल्या हल्ल्यांवर प्रथमच मौन सोडत मोदींनी राज्यसरकारांनी अहवाल बनवावेत, त्यामध्ये 80 टक्के गोरक्षक हे समाजकंटक असल्याचे आढळेल असे सांगितले.

तसंच, देशातल्या प्रत्येक वाईट घटनेसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरलं जातं अशी खंत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा प्रकार राजकीय सोय म्हणून किंवा टीआरपी मिळवण्यासाठी केला जातो असा आरोप केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close