वसईतील 8 गावांसाठी आंदोलन

April 10, 2010 1:07 PM0 commentsViews: 2

10 एप्रिल वसई विरार महापालिकेतून वगळण्यात यावे यासाठी वसईतील 8 गावांतील गावकर्‍यांनी आज मुंबई-अहमदाबाद हायवेवर रास्ता रोको केला. गावाकर्‍यांच्या मागणीनुसार महापालिकेतून 53 पैकी 35 गावे वगळण्यात आली आहेत. उरलेल्या 18 गावांपैकी 8 गावांच्या ग्रामसभांनी आपल्याला महापालिकेतून वगळावे असा ठराव मंजूर केला आहे. याच गावकर्‍यांनी आज आमदार विवेक पंडीत यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन केले. पोलिसांनी 100 आंदोलकांना यावेळी अटक केली.

close