सीआरपीएफचे जवान उपेक्षित

April 10, 2010 1:15 PM0 commentsViews: 2

10 एप्रिल पायात घालायला धड चांगले बूट नाहीत…कामाच्या वेळा ठरलेल्या नाही…अतिशय कमी पगार…आम्ही दुर्लक्षित आहोत, अशी खंत व्यक्त केली आहे.दंतेवाडामध्ये लढणार्‍या सीआरपीएफ जवानांनी…'सीएनएन-आयबीएन'चे रिपोर्टर सुमन चक्रवर्ती यांनी सीआरपीएफच्या जवानांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी आपली ही दुर्लक्षित असल्याची व्यथा बोलून दाखवली. राहण्याची अत्यंत निकृष्ट व्यवस्था, आम्हाला अधिकारी कोणत्याही वेळी कुठेही जायला सांगतात…76 सीआरपीएफचे जवान शहीद झाले, यात 2 जरी आयपीएस ऑफिसर असते तर सरकारची प्रतिक्रिया वेगळी असती, अशी संतप्त भावनाही या जवानांनी व्यक्त केली.

close