मुंडे-भुजबळांचे सूर जुळले

April 10, 2010 2:14 PM0 commentsViews: 5

10 एप्रिल महिला आरक्षण विधेयकात ओबीसी महिलांना आरक्षण हवे, अशी मागणी आता भाजपचे लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना पाठिंबा द्यायची तयारी त्यांनी दाखवली आहे. ओबीसींसाठी वेगळे मंत्रालय हवेच. त्यासाठी आता ओबीसींनी लढायला सज्ज राहावे. आणि त्याचे नेतृत्व भुजबळांनी करावे, असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे. तसेच मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसींचे आरक्षण काढून घेऊ नका, असेही त्यांनी म्हटले आहे.

close