गोदापार्क काय माझ्या बायका मुलांसाठी बांधलंय?,राज ठाकरे मीडियावर भडकले

August 7, 2016 5:23 PM0 commentsViews:

 raj_on_media07 ऑगस्ट : नाशिकमधील महापुरानंतर मनसेवर माध्यमांमधून झालेली टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या चांगलीच जिव्हारी लागलीये. नाशिकमधील गोदापार्क काय माझ्या बायका मुलांना खेळण्यासाठी बांधलंय का ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय.

भांडुपला एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात राज ठाकरेंनी माध्यमांनाही टार्गेट केलं. माध्यमं प्रत्येक गोष्टीकडं तिरकस नजरेनं पाहत असतात. चांगलं छापणार नाहीत पण वाईट पहिल्यांदा छापणार असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. दुसरीकडे राज्यातले सत्ताधारी आणि विरोधक महत्त्वाच्या विषयांकडं जनतेचं लक्ष वळवण्यासाठी वेगळ्या विदर्भासारखा मुद्दा पुढं केला जात असल्याची टीकाही त्यांनी केलीये. मुख्यमंत्री हे विदर्भातील आहे. त्यामुळे त्यांनी नीट काम केलं पाहिजे असा टोलाही राज यांनी लगावला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रायकडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी पत्रकाराला दमदाटी केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close