नवी मुंबई मतदानासाठी सज्ज

April 10, 2010 2:44 PM0 commentsViews: 5

विनय म्हात्रे, नवी मुंबई10 एप्रिल उद्या होणार्‍या नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापालिका सज्ज झाली आहे. या निवडणुकांमध्ये नव्या मुंबईतील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील प्रभागातील मतदान केंद्रावर आता वेब कॅमेरे बसविले जाणार आहेत.नवी मुंबईतील एरोली विभाग हा अतिसंवेदनशील विभाग म्हणून गणला जातो. ऐरोली विभागातील बहुतांश प्रभागाचा इतिहास पाहता येत्या निवडणुकांमध्ये कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी 22 अतिसंवेदनशील आणि 42 संवेदनशील मतदान केंद्रावर हे वेब कॅमेरे लावण्यात येणार आहे. बोगस मतदान होऊ नये यासाठी महापालिकेने सर्वतोपरी तयारी केली आहे. बोगस मतदानासाठी बोगस रेशनिंग कार्ड वापरली जातात. यासाठी 640 मतदान सेंटरवर 640 रेशनिंग कर्मचारी नेमण्यात आले आहेत.एकूण 6 लाख 29 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आढळल्याने महापालिकेने निवडणुकीसाठी आपला वेगळा पॅटर्न तयार केला आहे. नवी मुंबईच्या इतिहासात प्रथमच निवडणुकांमध्ये मतदान केंद्रांवर नवी मुंबई महापालिकेच्या हद्दी बाहेरील कर्मचारी असणार आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे, मिरा-भाईंदर येथील कर्मचारी दाखल झाले आहेत.नवी मुंबई पोलीस आणि महापालिकेने संयुक्तरित्या निवडणुकीचे प्लॅनिंग केले आहे. यामुळे ही निवडणूक शांततेत पार पडेल, अशी आशा दोन्हीही विभागांना आहे.

close