औरंगाबाद मतदानासाठी सज्ज

April 10, 2010 3:02 PM0 commentsViews: 6

10 एप्रिलऔरंगाबाद महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. सकाळी साडेसात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील 618 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यात 60 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. 99 वार्डांपैकी एका वार्डात बिनविरोध निवडणूक झाली. त्यामुळे 98 वार्डांसाठी 816 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होईल. या निवडणुकीसाठी तब्बल साडे चार हजार कर्मचारी काम करत आहेत. मतदानानंतर सोमवारी मतमोजणी होणार आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी शिवेसना- भारतीय जनता पक्षाची 20 वर्षांपासूनची सत्ता खेचण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यांच्यासोबत शहर प्रगती आघाडीचे प्रदीप जैस्वाल हेदेखील सत्ता बदलासाठी प्रयत्नशील आहेत. एकूण 99 जागांसाठी ही निवडणूक होते. पण एका ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्याने आता 98 जागांसाठी मतदान होणार आहे.इथे शिवसेना आणि भाजपची युती असून शिवसेना 55 तर भाजप 33 जागांवर लढत आहे. काँग्रेस 53 ठिकाणी, राष्ट्रवादी 30 ठिकाणी आणि प्रदीप जैस्वाल यांची शहर प्रगती आघाडी 16 ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. तर समाजवादी पक्ष आणि भारिप बहुजन महासंघ प्रत्येकी 20 ठिकाणी लढत आहे.

close