गृहखात्यावर अधिक लक्ष ठेवणारा माणूस हवा -शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

August 7, 2016 8:25 PM0 commentsViews:

pawar_on_cm3उस्मानाबाद, 07 ऑगस्ट : राज्याच्या गृहखात्यावर अधिक निगराणी ठेवणार्‍या माणसाची गरज असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री गृहखाते सांभाळण्यासाठी सक्षम नसल्याची विरोधी पक्षाच्या आमदारांकडून टीका होत असताना आता शरद पवारांनीही मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय.

उस्मानाबादमधील पोलिसानं बलात्कार केलेल्या पीडित मुलीची त्यांनी भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गृहखात्याचा कुणावरच धाक राहिला नसल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सूचित केलंय. अल्पवायीन मुलीवर पीएसआय प्रेम बनसोडेने होता बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला होता. ही घटना गंभीर आहे, त्याचा तपास महिला आधिकर्‍यामार्फत होवो ही मागणी होती आणि तो तपास सोपवला आहे. मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी अशी मागणी पवारांनी केली. तसंच या प्रकरणी शासकीय वकील नेमावा अशी मागणी राष्ट्रवादी करणार आहे. आरोपी हा पोलीस खात्यातील असल्यामुळे त्याला सहानभूती ने न पाहता पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही पवारांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close