डेक्कन चार्जर्सचे कम बॅक

April 10, 2010 3:12 PM0 commentsViews: 4

10 एप्रिलआयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स टीमने शानदार कमबॅक केले आहे. चेन्नई टीमचा त्यांनी सहा विकेट राखून पराभव केला. मॅचवर डेक्कनचेच वर्चस्व होते. आधी त्यांच्या बॉलर्सनी सुरेख बॉलिंग करत चेन्नई टीमला 138 रन्समध्ये रोखले. रायन हॅरिसने तीन विकेट घेतल्या. सुरेश रैनाने चेन्नईतर्फे एकाकी झुंज देत 53 रन्स केले. 138 रन्सचा पाठलाग करताना डेक्कनची सुरुवातही खराब झाली. पण टी सुमनने पुन्हा एकदा हाफ सेंच्युरी करत टीमला विजय मिळवून दिला. अँड्रयू सायमंड्सने त्याला चांगली साथ दिली. अखेर विसाव्या ओव्हरमध्ये डेक्कनने लक्ष्य पार केले.

close