माझ्यावर वार करा पण दलितांवर करू नका -नरेंद्र मोदी

August 7, 2016 9:30 PM0 commentsViews:

modi_qutar_speech07 ऑगस्ट : गुजरातमध्ये दलितांना तथाकथित गोरक्षकांकडून झालेल्या मारहाणीमुळे काहीशा बॅकफूटवर आलेल्या भाजपची बाजू आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सावरली. हैदराबादमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मोदींनी ‘वार करायचा असेल तर माझ्यावर करा दलितांवर नाही’ असं ठासून सांगितलं.

गेल्या अनेक दशकांपासून आपल्या समाजामध्ये वाईट घटनांमध्ये वाढ झाली आहे. पण अनेक महापुरुषांनी अशा घटनांच्या विरोधात लढा दिला. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटली आहे पण अजूनही अशा वाईट आणि विकृत घटना घडत आहे. दलितांवर का हल्ले केले जात आहे ? दलितांनी आतापर्यंत कमी अत्याचार सहन केले आहे का ? जर तुम्हाला हल्ला करायचा असेल तर दलितांवर करू नका माझ्यावर करा अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं. तसंच कोणतेही शास्त्र याला परवानगी देत नाही मग आपण का दलितांवर हल्ला करताय ? आपण का दलितांना प्रेम नाही देऊ शकत ? जर असंच सुरू राहिलं तर देश आणि जग आपल्याला माफ करणार नाही असंही मोदी म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close