शरद पवार-शिंदेंना पाहुन घेईन, सुभाष देशमुखांची जाहीर धमकी

August 7, 2016 9:53 PM0 commentsViews:

07 ऑगस्ट : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात, देशमुखांनी एकेकाळचे आपले राजकीय स्पर्धक शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना बघून घेण्याची भाषा वापरली.

deshmukh_on_pawarया दोन बलाढ्य नेत्यांना आवाहन देताना देशमुख म्हणाले, राजकारणामध्ये आपण खूप भोगलंय, खूप लोकांनी मला त्रास दिलाय. आता माझे चांगले दिवस आले आहेत. खूप चांगली संधी मिळाली आहे. मला त्रास देणार्‍यांना मी सोडणार नाही, अशी दबंगगिरी देशमुखांनी जाहीर सभेत केली. ज्यांनी कुणी सुडाचं राजकारण केलं हे फक्त मला कानात सांगा त्यांना कुठे भरायचं ते मी बघतो. त्यासाठी मी खंबीर आहे. खालपासून वरपर्यंत सर्व काही मला माहित आहे, असंही देशमुख म्हणाले.

विशेष म्हणजे अलीकडे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सुभाष देशमुख यांचा समावेश झालाय. लाल दिवा मिळाल्यानंतर देशमुखांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच पाहून घेण्याची भाषा वापरलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close