हैदराबादमध्ये पोलीस-दहशतवाद्यात चकमक, 1 दहशतवादी ठार

August 8, 2016 1:02 PM0 commentsViews:

dassspy

08 ऑगस्ट :  हैदराबादपासून 60 किमी अंतरावर असलेल्या शादनगर इथे पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये 1 दहशतवाद्याला कंटस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे.

शादनगरमध्ये काही दहशतवादी लपल्याचे माहिती कळताच पोलीस शस्त्रासह इथे दाखल झाले. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमिवर हैदराबाद आणि तेलंगणामध्ये घातपात घडवण्याचा कट रचला होता. गेल्या दोन तासांपासून पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यातील काही दहशतवादी हे आधी माओवादी होते, असं सांगण्यात येत आहे. या चकमकीत सध्या 1 दहशतवादी ठार झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close