खातेवाटपानंतर आता मंत्रिमंडळात पालकमंत्रिपदावरुन संघर्ष?

August 8, 2016 2:35 PM0 commentsViews:

ðÖÖêŸÖÖêÛúÃÖÖêy

मंत्रिमंडळातल्या खातेवाटपानंतर राज्यातल्या मंत्र्यांमधली नाराजी चव्हाट्यावर आली होती. आता पालकमंत्रिपदावरुनही मंत्र्यांमध्ये संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. जळगाव, सोलापूर,नंदुरबार आणि धुळ्याचे पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्हे चार आणि पालकमंत्र्यांसाठी दावेदार अनेक अशी स्थिती निर्माण झाली आहे. जळगावच्या पालकमंत्रिपदासाठी गिरीश महाजन उत्सुक आहेत. तर शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनाही जळगाव हवं आहे. एकनाथ खडसे मात्र पांडुरंग फुंडकर आणि दिलीप कांबळेंसाठी आग्रही आहेत.

सोलापुरात तर दोन देशमुखांमध्ये उभा वाद आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि राज्यमंत्री विजय देशमुख यांच्यातलं सख्य सर्वश्रूत आहे. त्यात सुभाष देशमुख कॅबिनेटमंत्री झाल्यानं त्यांनी पालकमंत्रिपदावर दावा केला आहे.

दुसरीकडं मित्रपक्षाचे राज्यमंत्री असलेल्या सदाभाऊ खोतांनी सांगलीसाठी आग्रह केला आहे. तर महादेव जानकर पंकजा मुंडे यांच्याकडील एका जिल्ह्यासाठी आग्रही आहेत.

त्यामुळं खातेवाटपानंतर आता पालकमंत्रीपदाच्या नेमणुकीवरुन मंत्रिमंडळात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close