सेना नेत्यांची नाराजी दूर होणार?, मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंची ‘वर्षा’वर बैठक

August 8, 2016 4:46 PM0 commentsViews:

uddhav_on_cm08 ऑगस्ट : शिवसेना आणि भाजपमधील धुसफूस काही कमी होत नाहीये. यावर तोडगा काढण्यासाठी आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर भाजप आणि शिवसेना नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपचे जेष्ठ नेते अणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे सर्व मंत्री आणि प्रतोद उपस्थित असणार आहेत.

शिवसेना सत्तेत असुनही शिवसेना आमदारांची मतदार संघातील कामं होत नाहीत. तसंच शिवसेना आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. या बैठकीआधी 4.30 वाजता शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवस्थानी नंदनवन इथं शिवसेना मंत्री आणि प्रतोदांची बैठक होणार आहे.

दरम्यान शिवसेना आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.शिवसेना आमदारांच्या प्रलंबित मांगण्यांबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ही चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close