बाळगंगा प्रकल्प प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट ?

August 8, 2016 8:39 PM0 commentsViews:

मुंबई, 08 ऑगस्ट : बाळगंगा सिंचन प्रकल्प गैरव्यवहार प्रकरणी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल झालंय. एसीबीने 10 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. एकूण 30 हजार पानांचे हे आरोपपत्र असून, 10 जणांच्या विरोधात हे आरोपपत्र एसीबीने दाखल केलय. पण या प्रकरणी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात मात्र माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांचे नाव नाहीये. त्यामुळे अजित पवारांना एसीबीने क्लीन चीट दिलीये का असा प्रश्न निर्माण झालाय.1111ajit_pawar_ncp

आरोपपत्रात ठाणे येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. एकूण 30 हजार पानांचे हे आरोपपत्र असून, 10 जणांच्या विरोधात हे आरोपपत्र एसीबीने दाखल केलंय. एफ ए कंनस्ट्रक्शन आणि एफ ए एटंरप्रायजेसचे फतेह खत्री, निसार खत्री, अबीद खत्री आणि झाहीद खत्री यांना आरोपी बनवण्यात आलंय.

तर, गिरीष बाबर, तत्कालीन कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विभाग बाळासाहेब पाटील, तत्कालीन मुख्य अभियंता, कोकण प्रदेश मुंबई रामचंद्र शिंदे, तत्कालीन अधिक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे आनंदा काळुखे, तत्कालीन कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे विभाग 1 – कोलाड राजेश रिठे, तत्कालीन सहाय्याक अभियंता, कोलाड विजय कासाट, तत्कालीन शाखा अभियंता, कोलाड या अधिकार्‍यांना या आरोपपत्रात आरोपी बनवण्यात आले आहे.

या आरोपपत्रात तत्कालीन मंत्री अजित पवार यांचे नाव नसल्याने अजित पवार यांना क्लीन चीट दिल्याचे बोलले जात आहे. पण, एसीबी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही अजित पवार यांची चौकशी सुरू असून त्यांची भूमिका या गैरव्यवराहारात स्पष्ट झाली.त्यामुळे त्यांना क्लीन चीट दिली गेली नसल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close