पंतप्रधान अमेरिका दौर्‍यावर

April 10, 2010 4:59 PM0 commentsViews:

10 एप्रिलपंतप्रधान मनमोहन सिंग आज अमेरिकेच्या दौर्‍यावर रवाना झाले. उद्या ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतील. या भेटीदरम्यान भारताकडून काही महत्त्वचे मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो, पाकिस्तानच्या अण्वस्त्र सुरक्षेसंदर्भातील…पाकिस्तानातली अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागण्याची भारताला वाटणारी भीती पंतप्रधान ओबामांजवळ व्यक्त करतील. 26/11 हल्ल्यातील आरोपी डेव्हीड हेडली कोलमनची थेट चौकशी करण्याची संधी भारताला द्यावी, अशी विनंतीही यावेळी केली जाऊ शकते. अमेरिकेच्या पाक-अफगाणिस्तान धोरणाबद्दलही चर्चा या बैठकीत होऊ शकते. तर, न्यूक्लिअर लाएबिलिटी विधेयकासंदर्भात अमेरिकेकडून भारताला विचारणा होऊ शकते.

close