पित्यानेच केला व्यसनी मुलाचा खून

April 10, 2010 5:47 PM0 commentsViews: 2

10 एप्रिलमुलाच्या व्यसनीपणाला कंटाळून पित्यानेच मुलाचा खून केल्याची घटना नागपुरात घडली आहे. शैलेश जमदाडे असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील संभाजी जमदाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. ते सेवानिवृत्त रेल्वे पोलीस कर्मचारी आहेत.बेरोजगार असलेला शैलेश रोज दारू पिऊन कुटुंबातील व्यक्तींना मारहाण करत होता. त्याच्या या वागणुकीला कंटाळून तो झोपलेला असताना त्याच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार करून संभाजी यांनी त्याचा खून केला.

close