‘महाराष्ट्र घरकुल’ योजनेचा शुभारंभ

April 10, 2010 5:53 PM0 commentsViews: 47

10 एप्रिल'महाराष्ट्र घरकुल' योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातून केले. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय, ग्रामीण विकास मंत्रालय आणि आदीवासी विकास विभागातर्फे ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील बीपीएल धारकांना 6 लाख घरे देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 70 हजार, तर शहरी भागात दीड लाखात घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

close