हुकलं..! अभिनव ब्रिंदाला पदकाची हुलकावणी

August 8, 2016 9:46 PM0 commentsViews:

08 ऑगस्ट : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्या वहिल्या पदकाचा ‘निशाना’ चुकलाय. पदकाची अपेक्षा लागून असलेल्या अभिनव ब्रिंदाकडून अपेक्षाभंग झालीये. बिंद्राचं 10 मीटर एअर रायफलमध्ये ब्रॉन्झ पदक हुकलंय. शूट ऑफमध्ये बिंद्राला चौथ्या नंबरवर फेकला गेल्यामुळे त्याला बाहेर पडावं लागलं.abhinava_bindra3

अभिनव बिद्रानं 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज फायनलमध्ये धडक मारल्यामुळे पहिल्या पदकाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या. अभिनव बिंद्रानं आठवे स्थान पटकावत फायनलमध्ये धडक मारली आणि नेमबाजीत भारताच्या पदकाची आशा जिवंत केली.

भारताकडून अभिनव ब्रिंदाने पहिला सीरिजमध्ये 104.4, तिसरी 105.9, चौथी 103.8, पाचवी 102.1 आणि सहाव्या अंतिम सीरिजमध्ये 105.2 गुण मिळवले आहे. एकूण 625.7 अंक मिळवून फायनलमध्ये धडक मारली आहे. अभिनव बिंद्राने सातव्या स्थानावर जागा बनवलीे होती. पण, फायनलमध्ये 14 शॉट नंतर बिंद्रा चौथ्या स्थानावर पोहोचला. 15 व्या शॉटनंतरही तो चौथ्याच नंबरवर होता. त्यानंतर शूट ऑफमध्ये निशाना चुकला आणि ब्रिंदा बाहेर पडला.

तर दुसरीकडे गगन नारंगने पहिल्या सीरिजमध्ये 105.3 आणि दुसरी 104.5 गुण मिळवले. पण तिसर्‍या 102.1, चौथ्या 103.4, पाचव्या 101.6 आणि सहाव्या प्रयत्नात 104.8 गुण मिळवले. नारंगचा एकूण स्कोअर हा 621.7 राहिला. त्याला 23 व्या नंबरवर समाधान मानावे लागले.

विशेष म्हणजे या स्पर्धेत 6 खेळाडूच फायनलसाठी क्वालिफाय होऊ शकता. यात बिंद्राने फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलंय. तर नारंगला बाहेरचा रस्ता पकडावा लागला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close