…तेव्हा जीएसटीबद्दल शंका होती,नरेंद्र मोदींनी केलं मान्य

August 8, 2016 10:42 PM0 commentsViews:

08 ऑगस्ट : राष्ट्रनिती ही राजनिती पेक्षा मोठी आहे. जीएसटी हे कोणा एका पक्षाचं श्रेय नाही तर हा विजय लोकशाहीचा आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले. जीएसटीमुळे राज्य स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच मी मुख्यमंत्री असताना माझ्याही मनात जीएसटीबाबत शंका होत्या अशी कबुलीही दिली.

narendra_modi_loksabhaलोकसभेमध्ये आज (सोमवारी) जीएसटी विधेयक मांडण्यात आलं. जवळपास 4 तास ही चर्चा सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणामध्ये जीएसटीचा जोरदार पुरस्कार केला. राज्यसभेत काँग्रेससह इतर विरोधकांनी जीएसटीला पाठिंबा दिला होता. हाच धागा पकडून मोदींनी देशासाठी ऐक्याचा नारा दिला. जीएसटी मंजूर होणं हा कोणत्याही एका पक्षाचा विजय नाही तर संपूर्ण लोकशाहीचा विजय आहे असं ते म्हणाले. त्याचबरोबर जीएसटीमुळे ग्राहकवर्गाला राजाचा दर्जा मिळणार आहे, असं ते म्हणाले. जीएसटीच्या इतर फायद्यांचीही त्यांनी उजळणी केली.

जीएसटी मुळे नेमकं काय होणार?

व्यापारी आणि उद्योजक यांची अनेक कर भरण्यातून सुटका होणार
एलबीटी, जकात, अबकारी कर रद्द होणार
करांच्या सुलभीकरणामुळे पारदर्शकता येणं अपेक्षित
कर कमी झाल्यामुळे वस्तूंच्या किंमतींमध्ये घट होईल
महागाई आणि मंदीवर आळा येणार?
वेगवान विकासाचं स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असा तज्ज्ञांना विश्वास


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close