खंडणी प्रकरणी पीआय धनंजय धुमाळ यांच्या चौकशीचे आदेश

August 9, 2016 12:19 PM0 commentsViews:

09 ऑगस्ट :  पुण्यातल्या प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पीआय धनंजय धुमाळ हे 25 लाखाची खंडणी मागताना एका स्टिंगमध्ये कैद झाले आहेत. हे स्टिंग संदीप जाधव नावाच्या बिल्डरने केलेलं आहे. विशेष म्हणजे धनंजय धुमाळ हे 25 लाख रूपये पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावावर मागताना स्टींगमध्ये दिसतायत. बाणेरमधल्या एका जमीन व्यवहारासाठी बिल्डर संदीप जाधव आणि धनंजय धुमाळ यांच्यात हा संवाद झाला आहे. धनंजय धूमाळ यांच्यावर एटीएसनं याअगोदरही खंडणीचा एक गुन्हा दाखल केलेला आहे. संदीप जाधव यांनी केलेलं हे स्टिंग यूट्युबवरही अपलोड केलं आहे.

Pune khandani21

……………………………………………………………………………………………………………………………………………….

काय आहे हा वाद?

  • पुण्याच्या बाणेरमध्ये सर्व्हे क्रमांक-90 च्या जमिनीचा वाद त्यासंदर्भातच धुमाळ यांनी खंडणी मागितल्याचा आरोप
  • कचरदास मुथा यांच्याकडून 80 लाखाला संदीप जाधव यांनी 2013 मध्ये ही जमीन खरेदी केली
  • तत्पूर्वी 1990 मध्ये कचरदास मुथा यांनी ही जमीन संजय वाघमारे आणि चांदेरे यांना साठेखताने विकली होती
  • जमिनीचा ताबा वाघमारे आणि चांदेरे यांच्याकडं असल्यानं जमिनीच्या मालकीचा वाद निर्माण झाला
  • जमिनीच्या ताब्यावरुन दोन्ही पक्षांचा वाद, चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात अर्ज आले होते
  • जमिनीचा ताबा मिळवून देण्याच्या मोबदल्यात संजय धुमाळ यांची 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी

पीआय धनंजय धुमाळवर खंडणीचा आरोप
……………………………………………………………………………………………………………………………………………….
पार्ट 1

बिल्डर जाधव: सर, आपण हे पंचवीसचं केलं तर पुन्हा मॅडम बोलवणार वगैरे नाही ना..म्हणजे वन्स अँन्ड फॉर ऑल..

पीआय धूमाळ: नाही नाही, नावच घेऊ नको, आपण बोलतानासुद्धा त्यांचं नाव घ्यायचं नाही. मी तुला सांगितलंय ना नाव नको घेऊ

बिल्डर जाधव: नाही सर, नाही मी फक्त मॅडम म्हटलंय

पीआय धूमाळ: काहीही असू देत, मी तुला सांगितलंय तसं कर

बिल्डर जाधव: मला फक्त यातून बाहेर काढा सर, दॅटस् ऑल

पीआय धूमाळ: तुला सांगतो, मी एटीएसला असताना गुन्हा दाखल झाला पण माझं
कुणीही वाकडं करू शकलं नाही. कारण मी काही केलेलं नाही

बिल्डर जाधव: ज्वाईंट सीपी माझी चौकशी करतायत इकडून तिकडून सर

पीआय धूमाळ: हां..करतायत ना..करतो मी
……………………………………………………..……………………………………………………..…………………………………
पार्ट 2

पीआय धूमाळ: आज संध्याकाळपर्यंत होईल का काम?

बिल्डर जाधव: सर माझ्याकडे 14 तयार आहेत सर

पीआय धूमाळ: कधी पर्यंत होईल काम ?

बिल्डर जाधव: उद्या संध्याकाळपर्यंत 25 पूर्ण करू शकतो सर

पीआय धूमाळ: बर

बिल्डर जाधव: सर थोडासा प्रॉब्लेम आहे सर, काय झालंय सगळी कॅश हजार पाचशेत आहे..काय मार्केटमध्ये कॅशचा शॉर्टेज आहे..

पीआय धूमाळ: हरकत नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, तुला जसं जमतं तसं कर, चार पाच दिवस कुठं जाऊन रहावू शकतो का?

बिल्डर जाधव: जाऊ शकतो सर, गोवा बिवा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close