फॅमिली कोर्टाच्या पुढाकाराने पुन्हा जुळल्या ‘रेशीम गाठी’

August 9, 2016 2:50 PM0 commentsViews:

प्रवीण मुधोळकर, नागपूर
09 ऑगस्ट :  बदलत्या जीवनशैलीमुळे तसंच टीव्ही आणि सोशल मिडियाच्या अति वापरामुळे समाजात घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललंय. दर महिन्याला हजारो फॅमिली कोर्टात येतात आणि वर्षानुवर्षं सुरू राहतात. पण नागपूरच्या फॅमिली कोर्टाने तब्बल 100 जोडप्यांमध्ये मध्यस्थी करून त्यांचा संसार सुखाचा केला.

court

‘नांदा सौख्यभरे’ या कार्यक्रमात आत्मविश्‍वासाने आणि आनंदाने बोलणार्‍या या तरुण महिलेचं जीवन पूर्वी कधीही एवढं आनंदी नव्हतं. या महिलेचे पती एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत. पण छोट्या-मोठ्या भांडणांमुळे कलह वाढत गेला आणि प्रकरण कैटुंबिक न्यायालयात गेलं. नागपूरच्या कौटूबिक न्यायालयातील काऊंन्सिलर आणि मध्यस्तांच्या मदतीने दोघांचा संसार सुरळीत झालेत. अशाच 100 जोडप्यांचे संसार न्यायालयाच्या पुढाकाराने बचावले आहेत.

पती पत्नीमधल्या वादाच्या अनेक प्रकरणात वकिलांच्या सल्ल्यामुळेही खटले अनेक वर्षं चालत राहतात. पण नागपूरच्या ‘नांदा सौख्यभरे’ हा कार्यक्रम वकीलांच्या संघटनेनच आयोजित केल्याने वकिलांचंही कौतुक होत आहे.

‘Marriages are made in heaven and celebrated on earth’ असं म्हटल जातं. लग्न टिकवण्याची जबाबदारी खरं तर पती पत्नीचीच… पण नांदा सौख्य भरे सारख्या उपक्रमांमुळे संसार सुरळीत चालवण्यासाठीचा मार्ग अनेकांना मिळाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close