विदर्भवाद्यांचा गडकरींच्या घरावर मोर्चा, श्रीहरी अणे मात्र गैरहजर

August 9, 2016 5:08 PM0 commentsViews:

nagapur_gadakariनागपूर, 08 ऑगस्ट : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर मोर्चा काढलाय. वेगळ्या विदर्भाचं आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या मोर्च्यात विदर्भवादी नेते श्रीहरी अणे गैरहजर होते.

आज दुपारी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरातील नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला होता. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीयाठी हा मोर्चा काढण्यात आला. गडकरींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मात्र, वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरणारे त्यांचे नेते श्रीहरी अणेच या मोर्चात सहभागी नसल्यामुळे चर्चेला उधाण आलंय. मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर गडकरींच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close