महाड दुर्घटना : ऑडिट करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा,हायकोर्टात याचिका दाखल

August 9, 2016 5:58 PM0 commentsViews:

mahad_help (2)09 ऑगस्ट :  महाडमध्ये सावित्री नदीवरचा पूल कोसळल्याची दुर्घटना घडलीये. या प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलीये.

महाड पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. पुलाचं ऑडिट करणार्‍या इंजिनिअर आणि हायवे अथॉरिटीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आलीये. सामाजित कार्यकर्ते प्रणय सावंत यांनी ही याचिका दाखल केलीये. महाड दुर्घटनेच्या शोध मोहिमेचा खर्च हायवे अथॉरिटीकडून वसूल केला जावा अशी मागणी याचिकेत करण्यात आलीये. शिवाय जुन्या पुलांचं ऑडिट हायकोर्टाच्या देखरेखीखाली करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close