औरंगाबादमध्ये युतीची मुसंडी

April 12, 2010 7:36 AM0 commentsViews: 3

12 एप्रिलऔरंगाबादमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालासनुसार 99 पैकी शिवसेनेनं सर्वाधिक 26 जागा मिळवल्या आहेत. तर भाजपला 11 जागा मिळाल्यात. काँग्रेस 24 तर राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागांवर विजयी झाली आहे. शहर प्रगती आघाडीला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. मनसेला 1 जागा मिळाली आहे. सेना-भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी पण स्पष्ट बहुमत नसल्याने घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरै यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा मुलगा हृषीकेश खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नक्षत्रवाडी वार्ड क्रमांक 98 मधून हृषीकेश यांना काँग्रेसचे रावसाहेब गायकवाड यांनी धूळ चारली आहे. शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचा त्यांना फटका बसला आहे. आत्तापर्यंतच्या निकालांवर एक नजर टाकूयात…वॉर्ड क्रमांक 21 – अनंत घोडिले (काँग्रेस)वॉर्ड क्रमांक 24 – एमआयडीसी चिकलठाणा- राजू शिंदे (भाजप) वॉर्ड क्रमांक 27 – शताब्दीनगर – सुरेश इंगळे (अपक्ष) वॉर्ड क्रमांक 3 – राजू वानखेडेवॉर्ड क्रमांक 22- नारेगाव- मनिष दहिहांडे वॉर्ड क्रमांक 15- स्वामी विवेकानंद नगर- मोहन मेघावाले (शिवसेना) वॉर्ड क्रमांक 20 – आंबेडकर नगर- रामदास बोराडे (अपक्ष) वॉर्ड क्रमांक 41 – शहाबाजार- मीर हिदायत अली (काँग्रेस) वॉर्ड क्रमांक 25 – अयोध्यानगर- काशिनाथ कोकाटे – (राष्ट्रवादी काँग्रेस) वॉर्ड क्रमांक 26 – गणेशनगर – प्राजक्ता मंगेश भाले- (शिवसेना)वॉर्ड 44 – किराडपुरा- अफसरखान यासीन खान (राष्ट्रवादी काँग्रेस) वॉर्ड 9 – शांतीपुरा – मिलींद दाभाडे (भारिप बहुजन महासंघ) वॉर्ड 47 – सिडको एन- 6 – चव्हाण हुशारसिंग (शिवसेना)वॉर्ड 17 – श्रीकृष्णनगर – महेश माळवतकर (भाजप) वॉड 49 – गुलमोहर कॉलनी- रेखा जैस्वाल (काँग्रेस) वॉर्ड 19 – शिवनेरी कॉलनी, म्हाडा कॉलनी (अनिल जैस्वाल) शिवसेनावॉर्ड 22 – नारेगाव – मनिष दहिहांडे (शिवसेना) वॉर्ड 16 – मयूरनगर – किशोर नागरे – (शिवसेना)वॉर्ड 18 – उर्मिला चित्ते (भाजप) वॉर्ड 48 – अविष्कार कॉलनी – वीरभद्र गादगे (शिवसेना)

close