एक दिवस खेळाडूंसोबत राहून पाहा, सुशीलकुमारचं शोभा डेंना प्रत्युत्तर

August 9, 2016 9:43 PM0 commentsViews:

sushilkumar_shobhada09 ऑगस्ट : एक दिवस खेळाडूंसोबत राहून पाहा, त्यांच्या समस्या काय आहे त्या जाणून घ्या मग बोला असा टोला सुशीलकुमारने लेखिका शोभा डे यांना लगावला.

नेहमी या ना त्या कारणामुळे वादात राहणार्‍या लेखिका शोभा डे यांनी रिओ ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्यावरच टीका केली होती. ‘रिओ जाओ , सेल्फी लो..खाली हाथ वापस आओ..’…असं म्हणतं शोभा डे यांनी पैसे आणि संधी वाया घालवण्यासारखं असल्याची टीका केली आहे.

शोभा डे च्या या टीकेवर सगळ्या स्तरातून टीका होतेय. त्याला सुशीलकुमारने चांगलंच प्रत्युत्तर दिलं. एक दिवस खेळाडूमध्ये घालवा त्यांच्या समस्या जाणून घ्या…मग प्रतिक्रीया द्या असं आव्हानच सुशीलकुमारने शोभा डेंना दिलं.

तर अभिनव बिंद्राने शोभा डेच्या ट्वीटवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करणार्‍या तुमच्या खेळाडूंचा तुम्हाला अभिमान असायला हवा असा सल्ला अभिनवने दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close