कधी सुटणार आदिवासींच्या समस्या ?

August 9, 2016 10:00 PM0 commentsViews:

09 ऑगस्ट : आज जागतिक आदिवासी दिन आहे. आदिवासींच्या विकासासाठी आतापर्यंत कोट्यवधी खर्च झाले,अनेक योजना आखल्या, पण खरंच आदिवासींचा विकास झाला का हा प्रश्नच आहे. त्यामुळेच आदिवासींच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील वाड़ा जव्हार भागात भव्य मिरवणूक काढण्यात आली. आदिवासींची संस्कृती दाखवणारं लोकनृत्य आणि कला यावेळी सादर करण्यात आली. सिंधुदुर्गात भूमिहीन कातकरी समाजानं शौचालयाच्या मागणीसाठी आंदोलन केलं. भूमिहीन असल्यानं या समाजाला उघड्यावर शौच्याला जायला लागतं. नगर पंचायत या समस्येकडे दुर्लक्ष करतंय. त्यामुळे कातकरी समाजानं हे आंदोलन केलं. पालघरमध्ये भूमिसेना, एकता परिषद तसंच श्रमजीवी संघटनेनं मिरवणूक काढली. आदिवासींची संस्कृती दाखवणारे पारंपरिक, वेश, तसंच नाच-गाणी आणि तारपा नृत्य यावेळी बघायला मिळालं. तर घोडेगावमधल्या घोडनदीच्या काठावर राहणारा कातकरी समाज अजूनही हाल अपेष्टांचं जीवन जगतोय. त्यांच्याकडे ना घर, ना भांडी, ना रेशनिंग कार्ड, ना मतदार कार्ड..उदरनिर्वाहासाठी ते नदीतले मासे, खेकडे, शिंपले पकडून विकतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close