शिवसेना उभारणार 1857च्या स्वातंत्र्यसंग्रामातल्या स्वातंत्र्यवीरांचं स्मारक

October 15, 2008 7:18 AM0 commentsViews: 5

15 ऑक्टोबर, मुंबई -ऐन निवडणुकीच्या तोंडावर 100 कोटी रुपये खर्चुन काँग्रेसने शिवरायांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. तर त्याला एकप्रकारे प्रत्युत्तर देत शिवसेना भाजपने 1857 च्या लढ्यात शहिद झालेल्या हिंदू-मुस्लीम स्वातंत्र्यवीराचं एकत्रित स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. मुस्लीम मतदार राजा दुखावला जाऊ नये याची काळजी आता शिवसेना घेते आहे, असा आरोपशिवसेनेवर होत आहे.1857 चा स्वातंत्रलढा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते मंगल पांडे….पण याचस्वातंत्रलढ्यात शहीद झालेल्या मंगल गढीया आणि सय्यद हुसेन यांचं स्मारक मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणार आहे. शिवसेनेचे खासदार भारतकुमार राउतयांच्या संकल्पनेतून हे स्मारकं साकारलं जाणार आहे.

close