अंबरनाथमध्ये त्रिशंकू अवस्था

April 12, 2010 8:12 AM0 commentsViews: 2

12 एप्रिलअंबरनाथ पालिकेच्या सर्व 50 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पण इथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही.जाहीर झालेल्या निकालात सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी-आरपीआय आघाडी सत्तेकडे जाईल अशी शक्यता आहे. या तिघांच्या मिळून 20 जागा आहेत. इथे सध्या शिवसेना भाजप युतीची सत्ता होती. पण या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. शिवसेना भाजप मिळून 17 जागा आहेत. तर मनसेला 6 आणि अपक्षांना 7 जागा आहेत.शिवसेनेले इथे पुन्हा एकदा मनसेचा फटका बसला आहे. आता मनसे आणि अपक्ष अंबरनाथमध्ये किंग मेकर ठरणार आहेत. बहुमतासाठी 26 जागांची आवश्यकता आहे.

close