#Rio2016: विकास यादवकडून अमेरिकेच्या चार्ल्स् कोनवेलचा पराभव

August 10, 2016 9:39 AM0 commentsViews:

Vikas_2886569b_1470775541

10 ऑगस्ट : रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या दिवशी झालेल्या बॉक्सिंगच्या 75 किलो गटात भारताच्या विकास कृष्णनने अमेरिकेच्या चार्ल्स् कोनवेलचा पराभव करून दमदार सुरुवात केली. बॉक्सिंगच्या ‘राऊड ऑफ 32’मधील विजयासह विकासने प्री-क्वॉर्टर फेरीत प्रवेश केला आहे. तीन फेरीत झालेल्या या सामन्यात पंचांनी विकासला विजयी घोषित केलं.

स्पधङेच्या सुरुवाती पासूनच विकासने चांगला खेळ करत सामन्यावर पकड मिळवली. अमेरिकेच्या चार्ल्स् कोनवेलच्या तुलनेत विकासकडे बॉक्सिंगचा चांगला अनुभव होता आणि याचाच फायदा घेत विकासने मिळालेल्या संधीचे सोनं केल.

रिओ ऑलिम्पिक स्पधङेत भारताला आत्तार्यंत एकही पदक मिळवता आलेले नाही. यामुळेच भारताला बॉक्सिंगमधून पदकाच्या खूप अपेक्षा आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close