कांदा निर्यात धोरण आणि हमी भाव ठरवण्यासाठी दिल्लीत कृषिमंत्र्यांची बैठक

August 10, 2016 12:53 PM0 commentsViews:

444onion_nasik

10 ऑगस्ट : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद असल्यानं शेतकर्‍यांचं मोठं नुकसान होतं आहे. आज गोणीतील आणि खुल्या कांद्याचे लिलाव सुरू होणार होता मात्र, हे लिलाव पुढं ढकलण्यात आलेत. कांदा लिलाव सुरू न झाल्यानं कांदा उत्पादक शेतकर्‍यांचं मोठं नुकसान होतं आहे. याच पार्श्वाभूमीवर कांदा निर्यात धोरण आणि हमी भाव ठरवण्यासाठी दिल्लीत कृषिमंत्र्यांची बैठक होत आहे.

कांदा लिलावाचा तिढा अजून न सुटल्यानं सहकार खात्यानं कारवाईचा पवित्र्या घेतला आहे. सहकार विभागानं नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांना बरखास्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. नाशिकमधील कांदा व्यापारी सरकारशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच कांदा लिलावावर निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. या सगळ्यामध्ये कांदा उत्पादक शेतकर्‍यांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, या बैठकीत राज्य सरकार कांद्याची आधारभूत किंमत आणि कांदा निर्यातीच 5 वर्षाच धोरण ठरवण्यासंदर्भात मागणी करणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह, नितीन गडकरी, पणन मंत्री सुभाष देशमुख, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close