तामिळनाडूत चालत्या ट्रेनचं छत फोडून पावने सहा कोटींची लूट

August 10, 2016 1:40 PM0 commentsViews:

तामिळनाडू  – 10 ऑगस्ट :  तामिळनाडू म्हटलं की आठवतो तो रजनीकांत आणि त्याच्या फिल्ममधले अविश्वसनीय गोष्टी. पण तामिळनाडूत चोरांनी जो दरोडा टाकलाय तोही रजनीकांतच्या स्टंटना मागे टाकेल. सलेमहून चेन्नईला येणार्‍या ट्रेनवर चोरांनी दरोडा टाकत पावने सहा कोटी रूपयांची कॅश लंपास केली. रिझर्व्ह बँकेने 2005 च्या पूर्वीच्या नोटा परत मागवल्या होत्या. विशेष म्हणजे हा दरोडा धावत्या ट्रेनचं छत कापून हे पैसे लंपास केलेत.

train21321

या रेल्वेत 228 बॉक्समधून रिझर्व्ह बँकेचे 342 कोटी रूपये होते. या पैकी दोन बॉक्स दरेडेखोरांनी लंपास केले. सकाळी 11 च्या सुमारास एक कामगार रेल्वेच्या बोगीत गेला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

रेल्वे पोलिसांमधील वरिष्ठ अधिकारी एम रामासुब्रमनी म्हणाले, दरोडेखोरांनी किती पैसे गेले याची अद्याप स्पष्ट माहिती नाही. सध्या पैशांची मोजणी सुरू आहे. त्यामुळे अधिकृतपणे माहिती देऊ शकत नाही. मात्र आम्हाडा दरोडेखोरांची धागेदोरे सापडले आहेत. त्यानुसार तपास करण्यात येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close