हा विजय विकासकामांचा

April 12, 2010 9:26 AM0 commentsViews: 2

15 एप्रिलनवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला विजय हा विकासकामांचा आणि शरद पवारांच्या धर्मनिरपेक्ष मतांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया आज राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी 'आयबीएन-लोकमत'जवळ व्यक्त केली. धर्मनिरपेक्ष मतांसाठी काँग्रेसशी आघाडी व्हावी ही माझी इच्छा होती. पण काँग्रेसकडूनच माघार घेण्यात आली, असा दावाही त्यांनी केला. प्रचारात आम्ही कुठल्याही पक्षावर टीका केली नाही. तसेच काँग्रेसचे दिग्गज उमेदवार आमच्यामुळे पडले नाहीत, असेही ते म्हणाले. आता उरलेल्या निकालांमध्ये दोन अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी पुरस्कृत आहेत. तसेच दुसरे दोन अपक्षही आमच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले. आता पुढील काळात सिडकोच्या जुन्या घरांना मिळालेल्या अडीच एफएसआयची अमलबजावणी करणे, झोपडपट्टीधारकांसाठी एसआरए योजना राबवणे, गरीब मुलांना महापिलकेतर्फे पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असेही नाईकांनी यावेळी नमूद केले.

close