या स्वातंत्र्यदिनी देश बलात्कारमुक्त व्हावा -अमिताभ बच्चन

August 10, 2016 5:02 PM1 commentViews:

10 ऑगस्ट : देशभरात महिलांना वाढत्या अत्याचारामुळे बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपली अस्वस्थता बोलून दाखवलीये. प्रत्येक देशाची 50 टक्के शक्ती ही महिला असते. त्यामुळे आपला देश या स्वातंत्र्यदिनी बलात्कारमुक्त व्हावा, अशी अपेक्षा   अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलीये.amithabh_bacchan

अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट पिंकचं ट्रेलर काल लाँच झालं, त्यावेळेस त्यांनी हे मत व्यक्त केलंय आणि ट्विटरवरून ही त्यांनी हेच मत मांडलंय.  महिलांवर होणारे अत्याचार, हा विषय पिंक चित्रपटात अत्यंत संवेदनशीलपणे हाताळला गेलाय. हा चित्रपट महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे.

समाजात आज महिलांना अनेक समस्या आणि अत्याचारांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे महिलांनी आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपल्यातील बळाचा वापर महिलांनी केला पाहिजे. प्रत्येक देशाची 50 टक्के शक्तीही महिलांची असती असं माझं स्पष्ट मत आहे असंही अमिताभ बच्चन म्हणाले. तसंच महिलांचं शरीर ही काही लोकशाही नाही. आज वेळ आलीये हुकूमशाहीची  आणि त्यावर तिचा अधिकार आहे असं परखड मतही अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Yug Anant Shinde

    I would like to ask each and every man and women why don’t everyone ask to bring a change in LAW of rape cases, when we point a finger on other countries we should first check what are their LAWS against this kind do of offence.

close