आम्ही आदेश देऊनही कायद्याची अंमलबजावणी होत नाही : कोर्ट

August 10, 2016 5:26 PM0 commentsViews:

mumbai high court434मुंबई, 10 ऑगस्ट : संविधानकारांची भूमी असलेल्या राज्यात कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ध्वनी प्रदूषणासारख्या प्रश्नावर सरकारने विशेष लक्ष घालून काम केले पाहिजे पण याबाबत कोर्टाने सातत्याने आदेश देवूनही मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही हे दुर्देव आहे असं परखड मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांने होणारे ध्वनिप्रदूषण आणि अनधिकृत मंडप या मुद्दयांवर दाखल याचिकेवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने हा संताप व्यक्त केलाय.

मुख्य म्हणजे ध्वनी प्रदुषणाच्या मुद्दा हा कुठल्याही एका धर्माशी निगडीत नसून, सर्व धर्मांचा यात समावेश होतो असंही न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलंय. राजकीय पक्षांच्या सभा आणि जाहीर कार्यक्रमांदरम्यान ध्वनी प्रदूषण नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही राज्य सरकार मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले.

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांने होणारे ध्वनिप्रदूषण, सणांच्या दरम्यान होणारे ध्वनी प्रदूषण आणि अनधिकृत मंडप या मुद्दांवर दाखल याचिकेवर एकत्रित निकाल देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज सुरुवात केली असून, उद्याही न्यायालय या याचिकांवर आपला निकाल सुनावणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close