राखी सावंतची गुस्ताखी, नरेंद्र मोदींचा फोटो असलेला घातला ड्रेस

August 10, 2016 6:59 PM0 commentsViews:

rakhi sawant dresses10 ऑगस्ट : कायम वादात आणि चर्चेत असणारी आयटम गर्ल राखी सावंतने आता आणखी एका नव्या वादाला तोंड फोडलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेला तोकडे ड्रेस घालून तिनं फोटोसेशन केलंय.

अमेरिकेतल्या शिकागोत एका पार्टीमध्ये राखी सावंतने हा ड्रेस घालून सर्वांनाच धक्का दिलाय. या काळ्या रंगाच्या ड्रेसवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो आहेत. ड्रेसवर अगदी नको त्या भागावरही मोदींचे फोटो लावून तिनं वाद निर्माण केलाय.

सोशलमीडियावर तिच्या या अशा फोटोसेशनमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या आधीही तिने प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी सिलिंग फॅनवर बंदी घाला अशी मागणीच पंतप्रधानांकडे केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close