सानिया-शोएबचा निकाह उत्साहात

April 12, 2010 9:53 AM0 commentsViews: 2

12 एप्रिलगेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेला सानिया-शोएबचा निकाह अखेर आज उत्साहात पार पडला. हैदराबादच्या ताज कृष्णा हॉटेलमध्ये दुपारी एक वाजता हा सोहळा साजरा झाला. यावेळी सानियाने आपल्या आईची 25 वर्षांपूर्वीची लग्नाची लाल साडी परिधान केली होती. या कार्यक्रमात फक्त जवळच्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. जवळपास 70 लोक या समारंभाला उपस्थित होते. निकाह 15 एप्रिलला होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण हा निकाह तीन दिवस आधीच का करण्यात आला याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. लग्नानंतर उद्या मेहंदी आणि 14 तारखेला संगीताचा कार्यक्रम असेल. तर 15 तारखेला हैदराबादमध्येच रिसेप्शन होणार आहे. गेल्या काही दिवसांत शोएब-आयेशा प्रकरणामुळे या लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, शोएबचा पासपोर्ट अजूनही हैदराबाद पोलिसांकडे असल्याचे समजते. पोलिसांनी मात्र हा पासपोर्ट कोर्टात दिल्याचे सांगितले आहे. शोएबने कोर्टातून हा पासपोर्ट ताब्यात घ्यावा, असेही पोलिसांनी सुचवले आहे.

close