‘हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे’ होणार इतिहास जमा !

August 10, 2016 10:59 PM0 commentsViews:

पुणे, 10 ऑगस्ट : हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे हे वाक्य आता इतिहास जमा होणार आहे. कारण, केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण केंद्राने पुणे केंद्रावरून सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी प्रसारित होणार्‍या बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करायचं ठरवलंय.यामुळे पुणे केंद्रावर काम करणार्‍या निवेदक,वार्ताहर आणि इतर कर्मचारी वर्गावर ही गंडांतर येणार आहे.pune_akashwani

पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावरून आजही सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी प्रसारित केल्या जाणार्‍या बातम्यांची वेळ साधून अनेक जण घड्याळ
लावतात.स्थानिक बातम्यांसह राज्य,देश,जगाची खबरबातही ठेवतात. पण आता या बातम्या मुंबई वरून प्रसारित होणार आहेत.केंद्र सरकारच्या निर्णयानुसार पुण्याच्या प्रादेशिक विभागातील उपसंचालक आणि वृत्त संपादक ही दोन्ही पदे अनुक्रमे श्रीनगर आणि कोलकात्याला हलवण्यात येणार आहेत. यामुळे पुण्याचा वृत्त विभागच बंद होणार आहे. सरकारच्या निर्णयाचे राजकीय पडसाद उमले.मनसेनं मराठीची गळचेपी असल्याचं सांगत निदर्शनं केली. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनीही व्यंकय्या नायडूंना पत्र लिहलंय.

सुधा नरवणे,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ अशा अनेकांची वृत्त निवेदनाची कारकीर्द पुणे केंद्रात बहरली.गाडगीळ यांनी आठवणींना उजाळा देत या निर्णयाचे परिणामही संगितले. पुणेकरांनीही नाराजी व्यक्त केलीय.

गेल्या महिन्यात प्रेस इन्फ्रॉमेशन ब्युरोसाठीची पदे हलवण्याचा आदेश निघाला आणि काही दिवसात पीआयबीची दोन्ही पदेही दुसर्‍या ठिकाणी हलवली गेली.आता सकाळच्या बातम्यांचे पुणेकरांचे जिव्हाळ्याचे नाते असंच संपुष्टात येणार का असा सवाल विचारला जाऊ लागलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close