नंदूरबारमध्ये महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली, 17 प्रवासी सुखरुप

August 11, 2016 8:32 AM0 commentsViews:

nandurbar

नंदूरबार – 11 ऑगस्ट :  नंदूरबारमध्ये महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली. नवापूर तालुक्यात एसटी बस नदीत वाहून जाताना थोडक्यात बचावली आहे. स्थानिकांच्या मदतीने एसटीमधील 17 जणांना वाचवण्यात यश आलं. आज सकाळी 6:30 वाजता ही घटना घडली.

नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील रंगावली नदीच्या पुलावर बस असताना अचानक पुराच्या पाण्याचा लोंढा आला. याच पुराच्या पाण्यात एमएच 20 बी एल 2610 ही एसटी बस रंगावली नदीत वाहून जात होती. मात्र यावेळी प्रवाशांनी प्रचंड आरडाओरडा केला. त्यानंतर गावकर्‍यांनी प्रसंगावधान दाखवत जेसीबीच्या साहाय्याने बसमधून 17 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं. गावकर्‍यांनी प्रसंगावधान राखलं नसतं तर ही बस वाहून गेली असती.

दरम्यान, यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close