रंगिबेरंगी फुलांनी फुललं सातार्‍याचं कास पठार!

August 11, 2016 11:54 AM0 commentsViews:

तुषार तपासे, सातारा

11 ऑगस्ट :  सातार्‍याचं कास पठार रंगिबेरंगी फुलांनी फुलुन गेला आहे. श्रावणात फुलणार्‍या या रानफुलांचं सौंदर्य लुटायला कास पठारावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. चाला तर मग आपणही लुटुयात कासपठारावरच्या रानरंगांची उधळण…

kas pathar

वार्‍याची झुळूक त्यावर डौलणारी रंगबिरंगी फुलं आणि धुंद धुकं हे आल्हाददायक चित्र आहे सातार्‍यातल्या कास पठारावरचं. श्रावणाच्या पावलांनी इथल्या रंगिबेरंगी फुलांना बहर येतो आणि सारं पठार रंगुन जातं सौंदर्याची उधळण करणार्‍या रानरंगांनी.

कास पठारावर एकदाका पर्यटक आले की मग सुरू होते त्यांची धमाल. पठारावरचा फेरफटका, फुलांची पाहणी आणि फोटोसेशन. श्रावणात कास पठार रानफुलांनीही फुलतं आणि पर्यटकांनीही. राज्यभरातून पर्यटक कास पठारावर या रानरंगांची मजा लुटण्यासाठी येत असतात. गेल्या वर्षी एका दिवसात तब्बल 15 हजार पर्यटकांनी इथं भेट दिली. मात्र आता वन विभागाने खबरदारी घेतली आहे. दिवसाकाठी फक्त 3 हजार पर्यटकांना हा आनंद लुटता येणारा आहे आणि तोही पूर्वनोंदणी करून. http://www.kas.ind.in/ या वेबसाईटवर पर्यटकांना पूर्वनोंदणी नोंदणी करता येईल.

कासपठाराचा हा नैसर्गिक ठेवा असाच फुलत ठेवणंही आपल्याचं हातात आहे. त्यामुळे सहलीचा आनंद लुटा मात्र निसर्गाला हानी होणार याची काळजीही घ्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close