स्ट्रक्चरल ऑडिट मशीनच बंद, मग सावित्री पूलाचं ऑडिट झालं कसं ?

August 11, 2016 6:09 PM0 commentsViews:

auodit_machin11 ऑगस्ट : महाडच्या सावित्री नदीवरच्या कोसळलेल्या पुलाचं ऑडिट केल्याचा सरकारचा दावा संशयाच्या भोवर्‍यात सापडलाय. सरकारकडं असलेलं एकमेव ऑडिट मशीन गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. आयबीएन लोकमतच्या हाती ही धक्कादायक माहिती लागलीये. मशीन तीन महिन्यांपासून बंद आहे तर महाडच्या पुलाचं ऑडिट झालं कसं असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

पोलादपूर आणि महाड दरम्यान सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 42 जण बेपत्ता झाले आहे. आतापर्यंत 26 जणांचा मृतदेह सापडले आहे. मात्र, जो पूल वाहून गेला त्याचं ऑडिट मे महिन्यात झालं होतं आणि तो पूल चांगल्या परिस्थितीत होता असा दावा मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पण, मोबाईल स्ट्रकचरल मशीनच बंद असल्याचं समोर आलंय.

त्यामुळे या पुलाचं ऑडिट झाल्याचा सरकारचा दावा खोटा असल्याचं समोर आलंय. सध्याचं मोबाईल ब्रिज इन्स्पेक्शन युनिट हे रत्नागिरीत बंद असून ते दुरुस्त करण्यासाठी आता कर्मचारी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे जर पुलाचं ऑडिट झालं होतं की नाही असा सवाल उपस्थिती झालाय. एवढंच नाहीतर या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच पुलांचं आॅडिट करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पण, मशीन बंद असल्यामुळे आॅडिट होणार कसं  ? आणि याची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती का असे प्रश्न आता उपस्थिती झाले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close