आता महिला कर्मचार्‍यांना मिळणार 6 महिने प्रसुती रजा

August 11, 2016 5:13 PM0 commentsViews:

maternity leave india11 ऑगस्ट : राज्यसभेनं बहुप्रतीक्षित प्रसुती रजा अधिनियम विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलंय. त्यामुळे 18 लाख महिला कर्मचार्‍यांना भेट दिली आहे. या विधेयकामुळे प्रसुती रजा 3 महिन्यावरुन 6 महिने पगारी रजा मिळणार आहे. तसंच या महिलांना घरून ऑफिसचं काम करण्याची सुद्धा मुभा असणार आहे.

दोन अपत्यांच्या जन्मापर्यंत सहा महिने सुट्टी मिळेल तर तिसर्‍या अपत्याच्या वेळेस तीन महिन्यांची रजा मिळणार आहे. या शिवाय बाळ दत्तक घेणार्‍या महिलांना 3 महिन्यांची सुट्टी मिळेल, ज्या ऑफिसमधे 50 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्या ऑफिसमध्ये पाळणाघर करणं बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, या नियमचे कड़क पालन व्हावे यासाठी नोकरीच्या वेळी महिलांना लग्न आणि मुलांबद्दल प्रश्न विचारण्यावर बंदी आणावी म्हणजे सुट्टी द्यावी लागू नये म्हणून त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी मागणी खासदार रजनी पाटील यांनी या विधेयकाच्या चर्चेच्या वेळी राज्यसभेत केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close